किरीट सोमय्या sakal
महाराष्ट्र बातम्या

किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल; थोड्याच वेळात घेणार अंबाबाईच दर्शन

प्रकाश तिराळे

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. तर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. थोड्याच वेळात ते आंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूडला रवाना होणार आहेत. दरम्यान, आंबाबाई मंदिरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज दिवसभर ते पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. मुरगूडातून कोल्हापूरला येवून ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

भाजपचे माजी खासदार किरीट सोम्मया मुरगूड पोलीस ठाण्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आज (मंगळवारी, ता.28) दुपारी मुरगूडात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मात्र शहरातील सर्व दुकाने व अन्य व्यवहार सध्या सुरळीत सुरु आहेत.स्थानिक पोलीस यंत्रणा या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरु असल्यामूळे बाजारपेठेत फारशी वर्दळ पहावयास मिळत नाही.

किरीट सोमय्या थोड्याच वेळात आंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूडला रवाना होणार आहेत.

खुद्द ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना सोम्मयांच्या दौऱ्यात अडथळा करु नये.असे आवाहन केल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबद्दलची उत्सुकता कमी झाल्याचे निदर्शनास येते. तीन दिवसापूर्वी किरीट सोम्मया यांनी आपला कोल्हापूर दौरा पुन्हा जाहीर केला.त्यात त्यांनी दुपारी 12.30 वाजता आपण मुरगूड पोलीस ठाण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. मुरगूडचा आठवडा बाजार हा मुख्य बाजारपेठेत तसेच मुरगूड पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरच भरत असल्याने तो बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद केल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील बाजारपेठेत असणारी सर्व दुकाने,तसेच सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. शहरात सध्या स्ट्रायकिंग फोर्सचे 20 जवान,स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह 20 पोलीस कर्मचारी असे 40 पोलीस या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.बाजार पेठेत ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT