किरीट सोमय्या  sakal
महाराष्ट्र बातम्या

येत्या चार महिन्यात अर्धे मंत्रिमंडळ गायब,अर्धे हॉस्पिटलात; किरीट सोमय्या

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर ( सांगली) : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आज वाघवाडी फाटा (ता. वाळवा) येथे दिला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घेतली, पण ठाकरे सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त मोहीम हाती घेतली आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेत आता मला जो प्रतिसाद मिळत आहे, ती क्रांतीची सुरवात आहे, आम्ही आता हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घोटाळ्याची तक्रार देण्यासाठी कोल्हापूर येथे जात असताना त्यांनी वाघवाडी फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माजी आमदार भगवानराव साळुंखे, सी एस पाटील, संजय हवालदार, रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले, कालपासून रस्त्यावर विविध ठिकाणी आणि रात्री-मध्यरात्री रस्त्यात कार्यकर्ते थांबून मला प्रतिसाद देत आहेत. ही क्रांतीची सुरवात आहे. ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त आहे. त्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आमचा संकल्प आहे. या सरकारने खुप म्हणजे खूप नाटके केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पोलीस ठाण्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचे बारा महिन्यात आम्ही दोन डझन घोटाळे बाहेर काढले. चौकशी सुरू झाली आणि कारवाई सुरू झाली की हे कुठे तरी गायब होतात. अनिल देशमुखचाचा पत्ता कुणाला माहीत आहे? फक्त ठाकरे आणि शरद पवारांना माहितीय, कारण त्यांनीच त्याला लपवले आहे. देशमुख गायब, मुंबईचे पोलीस आयुक्त फरार झाले. मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये भरती झाले, आता हळूहळू चार महिन्यात ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ अर्धे गायब आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल. हे सगळे बदमाश आहेत, लुटारू, डाकू आणि हत्या करणारे आहेत.

कोविडमध्ये सगळे जग धग सोशीत होते आणि हे पैसे मोजत होते. आज ११ वाजता माझी एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. मी लाईव्ह सहभागी होणार आहे. ठाकरे यांनी त्यांचा मित्र, बिल्डर पार्टनर मुलुंडची जागा हॉस्पिटल बनवण्यासाठी घेतली. ती जागा महाराष्ट्र सरकारची, ५ ऑक्टोबर ला ६५ कोटीमंध्ये ती त्या बिल्डरला दिली. आणि ६ ऑक्टोबरला तीच जागा २१०० कोटींमध्ये विकत घेण्याचा निर्णय ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेने घेतला. आम्ही तक्रार केली. लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू झाली, आणि त्यानंतर सरकारने सांगितले की आम्ही हा निर्णय रद्द केला.

मी सांगितले, मी थांबणार नाही, जो निर्णय घेतलाय, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही त्यावर ठाम आहोत. आज तीच सुनावणी आहे. साडे बारा कोटी जनता आमच्या पाठीशी आहे. कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन दिले तर माझे कुणी काही बिघडवू शकत नाही. म्हणून इथून निघालो आहे, मी तिला प्रार्थना करणार आहे, तू शक्तीची देवी आहेस, राक्षसांचा वध केलास. या भ्रष्ट सरकारचा वध करण्याची शक्तिमला दे." माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, "सोमय्या यांनी आघाडी सरकारचा भ्रष्टाचार काढण्याचा यज्ञ हाती घेतला आहे. त्यांच्या या मोहिमेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत." भाजपचे इस्लामपूर शहराध्यक्ष अशोक खोत यांनी स्वागत केले. वाळवा शिराळा तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT