Kirit Somaiya Warned Uddhav Thackeray Government esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी..., सोमय्यांचा सरकारला इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता पाहण्यासाठी गेलो होतो म्हणून हा गुन्हा दाखल केलाय. भुजबळांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे. एफआयरची प्रत आमच्याकडे सुपूर्द केली आहे. पण, ही एफआयआर हास्यास्पद आहे, असं सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या आज सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजारो लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संजय राऊतांच्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करत नाही. पण, छगन भुजबळांची मालमत्ता पाहण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांवर का गुन्हा दाखल करतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं, असंही सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राला लुटणार आणि किरीट सोमय्या गप्प बसणार असं होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी मला तुरुंगात एक ना हजार वेळा टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करणार, असा इशारा देखील सोमय्यांनी दिला. तसेच त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. शिव्यांची शब्दकोश घेऊन एकदाच काय त्या शिव्या द्या. दररोज असं बोलू नका, असंही किरीट सोमय्या संजय राऊतांना म्हणाले.

किरीट सोमय्या आणि इतर कार्यकर्त्यांवर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाचे नियम भंग केल्याचा आरोप आहे. पण, त्यावेळी सोमय्या एकटे होते, दोन्ही बाजुला पोलिसांचा ताफा होता. राजकीय सूडभावनेतून नोटीस पाठवण्यात आली आहे. अजून सोमय्यांना समन्स पाठवला नाही, असं सोमय्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती

Horscope : उद्या 26 फेब्रुवारी! 'या' 5 राशींसाठी गुडन्यूज; घरी येणार पैसा, आरोग्याची मोठी तक्रार होईल दूर, करिअरला नवी दिशा मिळणार

SCROLL FOR NEXT