Kirit Somaiya on Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ''२० हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्यांची जनहित याचिका'', उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील सदनिका प्रकरण बाहेर काढलं आहे. ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान रचल्यानं सांगत कोर्टात याचिका दाखल केल्याचं सोमय्यांनी स्पष्ट केलं.

किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकारने मार्च २०२२ मध्ये मुंबईत ३५ हजार प्रकल्पग्रस्त सदनिका बनविण्यासाठी कंत्राट काढलं. शाहिद बलबा आणि अतुल चोरडिया या बिल्डरांना ६ कंत्राट दिले. त्यातला एक प्रकल्प मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ दुसरा कांजुरमार्ग इथे चांदणी बोरी इथे होणार होता.

तर प्रभादेवी इथे आणि जुहू मालाड इथे असे प्लान होते. या प्रकल्पाच्या माध्यामातून बिल्डर लोकांनी २० हजार कोटी लुटण्याचं कारस्थान रचलं होतं.

याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात २० हजार कोटींचा घोटाळा म्हणून सोमय्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

सोमय्या पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंडचा प्रकल्प थांबवावा, उद्धव ठाकरे यांचे कटकारस्थान थांबवावे लागणार आहे. मी या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारलाही प्रतिवादी म्हणून नमूद केले आहे. सर्व घोटाळ्यांवर इक्बाल चहल यांच्या सह्या आहेत. SIT नेमून चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून बाजूला करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT