Kirit Somaiya 
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya: तो व्हिडीओ खोटा असावा... किरीट सोमय्या प्रकरणी शहाजी बापू पाटलांची प्रार्थना

Sandip Kapde

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही व्हिडिओ क्लिप एका मराठी वाहिनीने प्रसिद्ध केली आहे. ही व्हिडिओ क्लिप समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षांनी किरीट सोमय्या आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या उद्धव गटाने हा विषय विधान परिषदेत उपस्थित केल्याची चर्चा आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. व्हिडीओची योग्य ती शहानिशा करुन गृहमंत्री कारवाई करतील. सरपंच पासून मुख्यमंत्री पर्यंत कुणीही लोकप्रतिनिधी असेल त्याची एक नैतिकता असते. हा व्हिडीओ खोटा असावा अशी मी प्रार्थना करतो", असे शहाजी बापू पाटील म्हणाले.

विरोधकांनी या प्रकरणी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजप नेहमीच नैतिकतेच्या गप्पा मारते. आता त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस दाखवले पाहिजे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले,  विधान परिषदेत किरीट सोमय्या यांच्या व्हिडीबाबत आवाज उठवणार आहे. तसेच शरद पवार गटाकडूनही विरोध करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: अश्लील कृत्य केले असताना त्यांना इतरांवर चिखलफेक करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान या प्रकरणी या प्रकरणात किरीट सोमय्या यांनी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT