महाराष्ट्र

पोलिस बळाचा किसान सभेकडुन निषेध

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिल्ली येथे शेतकाऱ्यांवर पोलिस बळाचा किसान सभेने निषेध केला आहे. 
गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत असल्याचे किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. देशभर शांततेच्या मार्गाने वारंवार आंदोलने करून आपल्या व्यथा, मागण्या, अपेक्षा सरकार समोर मांडत आहे. सरकार मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी मागण्या मान्य करते, मान्य मागण्यांची अंमलबजावणी मात्र करण्यात येत नाही. शेतकऱ्यांचा वारंवार विश्वासघात करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मनात यामुळे मोठा असंतोष खदखदतो आहे. आजच्या दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा असंतोष व्यक्त झाला आहे.

वारंवार होणारा विश्वासघात, धोरणे ठरविताना केला जाणारा दुजाभाव व उपेक्षा शेतकरी या पुढे सहन करणार नाहीत हा इशाराच या आंदोलनाने सरकारला दिला आहे.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील 180 संघटना नोव्हेंबर महिन्यात लाखोंच्या संख्येने लाँग मार्च काढणार आहेत. दिल्लीच्या चारही बाजूने चार लाँग मार्च संसदेच्या दिशेने नेण्यात येणार आहेत. आजचे दिल्लीतील आंदोलन त्या विशाल लढ्याची झलक आहे. सरकारने आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी व विश्वासघात करणे थांबवावे. अन्यथा विश्वासघाताची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT