Kishori Pednekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

'भोंगा' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण होताच किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी त्यांनी हे सगळ घडवून आणलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'भोंगा' चित्रपटाचं प्रदर्शन म्हणजे मनसेचा कमर्शिअल पब्लिसिटी स्टंट आहे. भोंग्याची (Bhonga) पार्श्वभूमी मनसेने चांगली तयार केली. सामाजिक मग धार्मिक तेढ याद्वारे भोंग्याला चांगली प्रसिद्धी दिली. कमर्शियल काम कस करता येईल हे मनसेकडून शिकावं असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, भोंग्यावरून मनसेने मुंबईचे वातावरण तापवलं. भोंग्यांचा कमर्शियल ट्रेंडिंग स्टंट करण्यासाठी त्यांनी हे सगळ घडवून आणलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, भोंगा २०१९ ला प्रदर्शित होणार होता पण त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ सुरु झाला. आता पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी मनसेने भोंग्याला प्रसिद्धी दिल्याचेही त्या म्हणाल्या.

मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर आम्ही त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू अशा आशयाचं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत केलं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ माजली. भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे ३ मे रोजी होणार काय, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिल असतानात मनसेक़डून ३ मे रोजी 'भोंगा' नावाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. भोंगा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आज मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते झाले. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पोस्टरच्या अनावरणानंतर पेडणेकर यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT