Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : अत्याचार पीडितेचा फोटो ट्विट केलेल्या राऊतांवर काय कारवाई होणार? जाणून घ्या...

संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी बार्शीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्या पीडित मुलीचा रक्तबंबाळ झालेला फोटो राऊत यांनी ट्विट केल्याने हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

बारावीचा पेपर देऊन घरी येणार्‍या मुलीला रस्त्यात अडवून दोन नराधमांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. पीडिता पोलिसात गेल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी न करता पोलिसांनी तिला घरी पाठवले होते. दुसर्‍या दिवशी पुन्हा ती पोलिसांत गेली होती. त्या दिवशी तिच्या घरी जाऊन त्या दोघांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली.

या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक एस. बी. फुलारी यांच्या आदेशाने एका सहायक पोलिस निरीक्षकासह एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणात पोलिस निरीक्षकांचा हलगर्जीपणा आहे का, याची पडताळणी उपअधीक्षक विशाल हिरे हे करीत आहेत. दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी विस्कळीत झाली आहे, हे दाखवण्यासाठी संजय राऊत यांनी त्या अल्पवयीन पीडित मुलीचा हल्ला झाल्यानंतरचा फोटो ट्विट केला होता. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

नोटीस देऊन स्टेटमेंट घेतले जाणार

पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो ट्विट केल्याने तिची ओळख झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बार्शी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राऊत यांना पोलिसांकडून नोटीस बजावली जात आहे. त्यांचे स्टेटमेंट नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT