Eknath Shinde: sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे कमी पडले?

Chinmay Jagtap

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वारं मोठ्या वेगात वाहिलं आहे. मात्र महाराष्ट्रात महायुतीला 2019मध्येजो करिष्मा करता आला तो करता आला नाहीये.

यामध्ये भाजपाला जरी कमी जागा मिळाल्या असल्या तरी सर्वाधिक फटका बसला आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अशावेळी एकनाथ शिंदे नक्की कुठे कमी पडले हा प्रश्न समोर येत आहे.

याविषयी काही राजकीय विश्लेषकांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये पणाला लावली.

स्वतःचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रचंड मेहनतही केली. मात्र त्यांना जनतेचा कौल मिळवण्यात अपयशच आले आहे.

यामागे काही महत्त्वाची कारण आहेत. त्यातल सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाकडूनच झालेला विरोध. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी भाजपकडून विरोध झाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक, ठाणे, मुंबई, विदर्भ अशा कित्येक ठिकाणी शिवसेनेला भाजपकडून चांगला प्रतीसाद मिळाला नाही. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये समन्वयस नसल्याचा थेट फटका हा एकनाथ शिंदे यांना बसला असल्याची चर्चा आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करत होते. मेहनत घेत होते. मात्र एकनाथ शिंदे वगळता दुसरा कोणीही नेता शिंदेंकडे प्रचारासाठी नव्हता. भाजपकडे ज्या प्रकारचा मोदींचा चेहरा होता तितका प्रभावी चेहरा स्वतः एकनाथ शिंदे यांचा नाही. यामुळेच एकनाथ शिंदे यांना प्रचारामध्ये प्रतिसाद व पाठबळ न दिल्यामुळे यांना महाराष्ट्रामध्ये फटका बसला असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातला मराठी मतदार हा शिवसेनेचा कोर मतदार आहे असं म्हटलं जातं. असं जरी असलं तरी देखील या बहुसंख्य मतदाराला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंविरुद्ध घेतलेली भूमिका पटली नाही. हेच यंदाच्या निवडणुकीमध्ये लक्षात येत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले तर एकनाथ शिंदेंपाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले

गरीब मध्यमवर्गीय किंबहुना मागास कुटुंबीय हे अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या नेता मानत नसल्याच पाहायला मिळत आहे. या सर्वांचा कल हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असून उद्धव ठाकरेंविषयी प्रचंड सहानुभूती या लोकांच्या मनात आहे. यामुळेच यंदाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना फटका बसल्याचे चित्र महाराष्ट्रामध्ये पाहिला मिळाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT