kokan railway sakal
महाराष्ट्र बातम्या

Kokan Railway : कोकण रेल्वेने गेल्या तीन महिन्यात ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा केला दंड वसूल!

उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्रास विना तिकीट प्रवास सुरू असताना कोकण रेल्वे मार्गावर देखील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्रास विना तिकीट प्रवास सुरू असताना कोकण रेल्वे मार्गावर देखील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. कोकण रेल्वे मार्गावर गेल्या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३) एकूण १८,४६६ अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकिटांशिवाय आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करत एकूण ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेने सांगितले.

वाढती प्रवासी गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रवाशांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरी देखील उपनगरीय रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान, एकट्या डिसेंबर २०२३ मध्ये एकूण ६,६७५ अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले.

अशा प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने सांगितले. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT