hasan mushrif sakal
महाराष्ट्र बातम्या

बँक निवडणूसाठी मुश्रीफांचे शर्तीचे प्रयत्न : 2 'नेत्यांना' प्रस्ताव

हसन मुश्रीफ; ‘राष्ट्रवादी’तर्फे इच्छुकांची बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी शिरोळ (Shirol) तालुक्यातून दत्त शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganapatrao Patil)आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar)हे दोघे इच्छुक आहेत. मात्र, तेथील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही नेत्यांना आम्ही प्रस्ताव दिला. विचार करून निर्णय सांगा, असेही सांगितले आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)यांनी दिली. आज शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुश्रीफ म्हणाले, की जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणे शक्य नाही. प्रत्येक तालुक्यात राजकीय इर्ष्या आहे, मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध शक्य आहे, तेथे संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिरोळ तालुक्यातील निवडणुकीसंदर्भात आज चर्चा झाली. मंत्री यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यासमोर आम्ही बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर त्यांना विचार करण्यास सांगितले. त्यावर ते काय सांगतात, हे दोन दिवसांत कळेल. जोपर्यंत सगळे अर्ज भरले जात नाहीत, तोपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.

दरम्यान, आज ‘राष्ट्रवादी’च्या इच्छुकांची बैठक झाली. त्यात शनिवारी (ता. २७) जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगण्यात आला. दोन दिवसांत सर्वांनी अर्ज भरावेत. त्यानंतर नेते सांगतील तसे करावे, अशी सूचना सर्व इच्छुकांना दिली आहे. शक्य त्या सर्व जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यावर भर राहील. बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, उद्योजक व्ही. बी. पाटील, मानसिंग गायकवाड, भय्या माने आदी उपस्थित होते.

आमची भूमिका ठाम

शिरोळ तालुक्यात गणपतराव पाटील हे सेवा सोसायटी गटातून बुधवारी (ता. १) अर्ज भरणार आहेत. त्यांना स्वाभिमानी संघटनेचा पाठिंबा आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडली. पाटील महाविकास आघाडीचाच एक भाग आहेत. त्यामुळे त्यांना सेवा सोसायटीमधून उमेदवारी मिळावी. मंत्री यड्रावकरांना आमचा विरोध नाही. त्यांना अन्य गटातून संचालक करावे. पण, शिरोळ तालुक्यातील सेवा सोसायटी गटातून पाटील उमेदवारी अर्ज भरणार, हे नक्की आहे.

पालकमंत्री, ग्रामविकाससंत्री आज अर्ज दाखल करणार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी उद्या (ता. २९)पासून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. उद्या ग्रामविकासमंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patl) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. याच ठिकाणी सकाळी पावणेअकराला मुश्रीफ व त्यानंतर पाटील अर्ज दाखल करतील. कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकेचे अर्ज भरण्यासाठी येताना कोरोनाचे सर्व नियम पाळावेत, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, अशा सूचना सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

Vilas Chavan Success Story : दगड फोडणाऱ्या हातांनी घडवला 'साहेब'; मजुराचा मुलगा बनला अधिकारी, विलास चव्हाणांची MIDC अभियंता पदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये भव्य ग्रंथ दिंडी

Konkan Holi Festival : एकमेकांच्या अंगावर फेकली जातात जळती लाकडे, होळीला रंगते देव-दानव युद्ध ! कोकणातील 'या' गावात शेकडो वर्षांची परंपरा

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

SCROLL FOR NEXT