Satej Patil On Delhi Tour For Ministry Post Kolhapur Marathi News  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Bank Election : वर्चस्वासाठी मंत्री, आमदार, खासदारांच्याच उड्या

जिल्हा बँकेचे राजकारण; सर्वसामान्य कार्यकर्ता उपेक्षितच; एकगठ्ठा मतदानावर डोळा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा बँकेचे (Bank Election)संचालक म्हणजे तालुक्यावर वर्चस्व, तालुक्यातील विकास सोसायटीच्या माध्यमातून मतदार संघातील गावांत वर्चस्व आणि हे वर्चस्व कायम राहावे यासाठी जिल्ह्यातील मंत्र्यांपासून ते आजी, माजी आमदार आणि खासदारांच्या जिल्हा बँकेसाठी उड्या सुरू आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात या नेत्यांच्या मागे जीवाचे रान करत पळणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र उपेक्षितच आहे.

जिल्‍हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात दोन मंत्री, चार विद्यमान आमदार, एक खासदार, एक माजी आमदार व एका माजी आमदार पुत्राचा समावेश आहे. अन्य संचालकांतही लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना संधी दिली आहे. यावेळीही याच संचालकांच्या कुटुंबातील किंवा संबंधितांचे नातेवाईकच रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांचाही यात नेत्यांसाठी बळी दिला जाणार आहे. त्यातही विद्यमान संचालक मंडळात वर्षानुवर्षे तेच लोक आहेत, त्यांच्याकडे इतर महत्त्वाची पदे आहेत.

जिल्हा बँकेचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात वर्चस्वर राहते. जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील विकास सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. विकास सोसायटीमार्फत तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जातो. जिल्ह्यातील सर्वच गावांत एक-दोन तरी विकास सोसायट्या आहेत. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून पहिल्यांदा या विकास सोसायटीवर व नंतर त्या गावांतही वर्चस्व मिळवता येते. या माध्यमातून एखाद्या गावांतील विरोधकालाही नामोहरम करण्याची संधी मिळते. यामुळेच बँकेच्या राजकारणात आतापर्यंत मंत्री, आमदार, खासदार यांच्याच उड्या पाहायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुंताशी नेत्यांच्या स्वतःचे साखर कारखाने, मोठ्या संस्था आहेत, अशा संस्थांना सरंक्षण व अर्थिक रसद मिळावी हेही या राजकारणामागचे एक कारण आहे.

जिल्हा बँक असो किंवा ‘गोकुळ’ याकडे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून बघितले जाते. ‘गोकुळ’च्या सत्तांतराचा अपवाद सोडला तर यापूर्वी या संस्थेवरही काही ठराविक कुटुंबांचीच मक्तेदारी राहिलेली होती. ही मक्तेदारी मे महिन्यात झालेल्या सत्तांतरात मोडीत निघाली असली तरी भविष्यात यात बदल होईल असेही नाही. जिल्हा बँकही त्याला अपवाद राहिलेली नाही आणि यापुढेही यात काही बदल होईल असे इच्छकांच्या नावांवर नजर टाकली तर वाटत नाही. मी नाहीतर माझी बायको किंवा मुलगा हेच संचालक असतील अशी काहींची मानसिकता असल्याने अशा मोठ्या संस्थांपासून सामान्य आणि राबणारा कार्यकर्ता दूरच आहे.

विद्यमान संचालकांतील दिग्गज

मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, डॉ. विनय कोरे, राजू आवळे, राजेश पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार पुत्र रणजितसिंह पाटील.

बँकेसाठी इच्छुक दिग्गज

पालकमंत्री सतेज पाटील, ‘दत्त-शिरोळ’ चे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT