Viral Video  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Viral Video : भाड्याच्या पैशावरून वाद! क्रूर रिक्षावाल्याने महिलेला नेलं फरफटत; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

एका महिलेला रिक्षा चालकाने काही किलोमीटर फरफटत रस्त्यावरुन नेलं, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अपघात घडले आहेत. अनेकांनी आपले जीव गमावले. अशीच एक थरारक घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.  (Marathi Tajya Batmya)

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान ही घटना दिल्लीतील एका घटनेची आठवण करून देते. दिल्लीमध्ये एक भयंकर अपघात घडला होता, ज्यामध्ये एका कार चालकाने एका महिलेले रस्त्यावर फरफट नेलं होतं, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.(Latest Marathi News)

रिक्षा चालकाने एका महिलेला काही किलोमीटरपर्यंत रस्त्यावरुन फरफटत नेलं, ही संपूर्ण घटना रस्त्यालगत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ही घटना काल (6 जुलै) रोजी घडली आहे. कोल्हापुरमधील राजारामपुरी येथे ही घटना घडली. रिक्षामध्ये साडी अडकल्यामुळे प्रवासी महिला गेली फरफटत गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक आणि संबधित महिलेमध्ये काही वेळ आधी भाड्यावरून वाद झाला होता. वाद मिटल्यानंतर रिक्षाचालक निघून जात असतानाच ही घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जवळील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे.(Latest Marathi News)

या प्रकरणाबद्दल रिक्षा चालकाकडे चौकशी केली असता त्याला याची कल्पना नसल्याचे त्याने सांगितले आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिक्षात साडी अडकल्यामुळे महिला फरफटत जात आहे. एक व्यक्ती जेव्हा समोरुन येऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा रिक्षावाल्याने त्याकडे लक्ष दिलं नाही. शिवाय त्याच्या रिक्षामागे काही लोक पळत आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT