5 State Assembly Election Impact on Maharashtra SAKAL
महाराष्ट्र बातम्या

ठरलं! कोल्हापूर उत्तरसाठी 12 एप्रिलला होणार मतदान

१७ मार्चपासून उमेदवारी ः आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिलला मतदान होत आहे. १७ मार्चपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कोल्हापूरसह देशभरातील पाच विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. (Kolhapur North Assembly Election 2022)

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे तत्कालिन आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांचे २ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. वास्तविक या निवडणुकीची घोषणा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत होण्याची शक्यता होती. पण केंद्रीय आयोगाने या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही घोषणा केली. कोल्हापूर उत्तरसोबत पश्‍चिम बंगालमधील (West Bengal) दोन, छत्तीसगड (Chhattisgarh) व बिहारमधील (Bihar) प्रत्येकी एका विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होणार आहे.

सविस्तर कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे - १७ मार्च

अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस - २४ मार्च

अर्जाची छाननी - २५ मार्च

अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस - २८ मार्च

मतदान - १२ एप्रिल

मतमोजणी १६ एप्रिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT