kolhapur north assembly election result jitendra awhad on Chandrakant patil Himalaya remark  
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले, परत..

सकाळ डिजिटल टीम

राज्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण पेटलेले असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झालेल्या या निवडणूकीत चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणूकत जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांना धूळ चारली. या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत खोचक टिका केली आहे.

आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हारलो तर हिमालयात जाईन या विधानाचा समाचार घेतला आहे, त्यांनी चंद्रकांत पाटील यांची एक मीम ट्विटरवर पोस्ट केली आहे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेसकडून देखील चंद्रकांत पाटील यांना त्याच वक्तव्यावरून डिवचलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या निवडणूकीत मिळालेल्या विजयाबाबत ट्विट करत “फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय… कोल्हापूरची जागा जिंकली… शाहू महाराज की जय”, असं म्हटलं आहे सोबत त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

तर आव्हाडांनी पोस्ट केलेल्या या फोटो मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून, त्यांचे हात घुडघ्यावर ठेवत ध्यान मुद्रेत डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो एडीट करून त्यांच्या माहे हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. याखाली दुसरं ट्विट करत “नको, परत या”, असा टोमणाही त्यांनी मारला आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या 'हिमालयात जाईन' या विधानावर स्पष्टिकरण देताना त्यांनी म्हटलंय की, आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग, मी लढलो तर काय होईल? मी लढलो आणि हारलो तर हिमालयात जाईल, असं मी म्हटलं होतं, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

Parner Accident: भरधाव डंपरखाली दुचाकीस्वार ठार, पारनेर तालुक्यात भीषण अपघात, पोयटा वाहतूक करणाऱ्या डंपरने युवकाला चिरडले

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! उच्चांकापासून 21 हजारांनी स्वस्त; दर आणखी कमी होणार? जाणून घ्या आजचा भाव

ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Sangamner Accident: पोहण्याचा आनंद ठरला काळ; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, दगडाच्या खाणीत पोहायला गेले अन् परतलेच नाहीत

SCROLL FOR NEXT