Raj Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "राज ठाकरे अंगार है, बाकी सब..."; घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दिला दम

समृद्धी महामार्ग चार वर्षात पूर्ण होतो पण मुंबई गोवा महामार्ग मागच्या एका दशकापासून पूर्ण का होत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

दत्ता लवांडे

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेल येथे निर्धार मेळावा आयोजित केला आहे. तर यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाच्या आधी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे. आपण कोणत्या घोषणा देतो? काय बोलतो? याचा किमान विचार तरी करा असं राज ठाकरे भाषणाच्या सुरूवातीला म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांची सभा सुरू होण्यापूर्वी कार्यकर्ते घोषणा देत होते. "राज ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है" अशा घोषणा दिल्या जात अशताना राज ठाकरे यांनी त्यांना शांत बसवले आणि म्हणाले की, "अंगार, भंगार म्हणजे काय? राज ठाकरे अंगार अन् बाकी सगळे भंगार म्हणजे त्या भंगारात आपण सगळे आलो ना? याचाही काहीतरी विचार करा" असं राज ठाकरे म्हणाले.

आपल्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरून सरकारला धारेवर धरलं असून वारंवार त्याच त्याच लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची आपली हिंमत कशी होते असा प्रश्न केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर १० वर्षात अडीच हजार मृत्यू झालेत, आत्तापर्यंत या रस्त्यावर १५ हजार ५६६ कोटी रूपये खर्च झाले आहेत पण रस्ता अजून कुठेच नाही, मग पैसे कुठे गेले? हा रस्त्या जाणून बुजून तर तयार गेला जात नाही असं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

समृद्धी महामार्ग चार वर्षात पूर्ण होतो पण मुंबई गोवा महामार्ग मागच्या एका दशकापासून पूर्ण का होत नाही असा सवाल करत कोकणचा विकास करायचा असेल तर एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT