Kopardi case chronology marathi news kopardi verdict
Kopardi case chronology marathi news kopardi verdict  
महाराष्ट्र

कोपर्डी : 13 जुलै 2016 ते 29 नोव्हेंबर 2017

सकाळ डिजिटल टीम

नगर जिल्ह्यातील कोपर्डीत शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचा पडसाद अवघ्या राज्यातच नव्हे, तर देशातही उमटले. मराठा समाज अफाट संख्येने रस्त्यावर आला. कोपर्डीतील आरोपींना शिक्षेसह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाने अभूतपूर्व मुक क्रांती मोर्चे काढले. जुलै 2016 ते नोव्हेंबर 2017 या 17 महिन्यांत नेमके काय काय घडले...?

घटनाक्रम

  • १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी (ता. कर्जत) येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून.
  • १४ जुलै : मध्यरात्री गुन्हा दाखल, कर्जत बंद आणि ‘रास्ता रोको’, आरोपी जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदे येथून पकडले. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अपर पोलिस अधीक्षक घनश्‍याम पाटील, उपअधीक्षक विजय लगारे घटनास्थळी.
  • १४ जुलै : कर्जतमध्ये महाविद्यालयीन तरुणांसह ग्रामस्थांचा आरोपींच्या अटकेसाठी ‘रास्ता रोको’.
  • १४ जुलै : ‘निर्भया’वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.
  • १५ जुलै : कोपर्डीत ‘चूल बंद’, श्रीगोंदे, जामखेडमध्येही ‘बंद’.
  • १५ जुलै : मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याला पोलिस कोठडी.
  • १६ जुलै : विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पालकमंत्री राम शिंदे यांची कोपर्डीस भेट.
  • १६ जुलै : खटल्याच्या कामकाजासाठी सरकारपक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी.
  • १६ जुलै : अन्य दोन आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे व संतोष गोरख भवाळ यांना अटक. आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा नगर शहर वकील संघटनेचा ठराव. 
  • १७ जुलै : नितीन भैलुमे व संतोष भवाळ यांना न्यायालयात आणले असता शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडी फेकली; दोन कार्यकर्त्यांना अटक.
  • १७ जुलै : सामाजिक संघटनांची पीडित कुटुंबीयांना भेट. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे कोपर्डीत दाखल.
  • १७ जुलै : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे कोपर्डीत. पालकमंत्र्यांच्या छायाचित्रासोबत आरोपीचे छायाचित्र टाकून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी जामखेडमध्ये गुन्हा दाखल. 
  • १८ जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कोपर्डी प्रकरणावरून खडाजंगी. विरोधकांनी कामकाज बंद पाडले. 
  • १८ जुलै : विविध पक्ष व संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्ह्यात सर्वत्र ‘बंद’. माजी मंत्री सुरेश धस, चंद्रशेखर घुले, आमदार अरुण जगताप यांचा मोर्चात सहभाग.
  • १८ जुलै : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मृत मुलीच्या कुटुंबीयांचे सांत्वन.
  • १९ जुलै : ‘विधानसभेत विरोधकांकडून आरोपीला फाशी देण्याची मागणी. ही घटना क्‍लेशदायक, मानवतेला काळिमा फासणारी; अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे...’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भावना.
  • १९ जुलै : शालेय विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन तरुणींचा तहसीलवर मोर्चा, जिल्हाभर मोर्चे, प्रशासनाला निवेदने सादर. आरोपींच्या पुतळ्यांचे दहन.
  • २० जुलै : पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला कोपर्डीत. महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्‍वासन. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची कोपर्डी भेट. 
  • २० जुलै : सकाळ सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने पीडित मुलगी व तिची बहीण शिकत असलेल्या कुळधरण (ता. कर्जत) येथील विद्यालयातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकट्टी यांच्याकडून स्वसंरक्षणाचे धडे.
  • २१ जुलै : माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी कोपर्डीत जाण्यापासून रोखले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री राम शिंदे यांची कोपर्डी भेट. जिल्ह्यात कॅंडल मार्च, ‘रास्ता रोको’.
  • २२ जुलै : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कोपर्डीला भेट. भय्यूजी महाराज यांनीही पीडित कुटुंबियाची भेट घेतली, त्यांच्या सूर्योदय परिवारातर्फे दोन स्कूल बस भेट.
  • २३ जुलै : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना न भेटण्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा निर्णय. त्यामुळे आठवले यांचा कोपर्डी दौरा अचानक रद्द.  
  • २४ जुलै : कमालीची गुप्तता पाळत मुख्यमंत्र्यांचा बारामतीमार्गे कोपर्डी दौरा. ‘महिनाभरात दोषारोपपत्र दाखल करू, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम खटल्याचे कामकाज पाहणार,’ अशी घोषणा.
  • २५ जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोपर्डीत. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आरोपींना न्यायालयात मारहाण करण्याचा प्रयत्न. आरोपींना घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्यात आला.
  • २६ जुलै : कोपर्डी येथील पीडितेच्या कुटुंबीयांकडून शस्त्रपरवान्यासाठी अर्ज.
  • २७ जुलै : आरोपी जितेंद्र शिंदेच्या पोलिस कोठडीत वाढ.
  • २८ जुलै : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानकडून (सोनई) पीडित मुलीच्या बहिणीच्या शैक्षणिक पालकत्वाची तयारी. 
  • ३० जुलै : आरोपींच्या मानसशास्त्रीय चाचण्यांसाठी अर्ज.
  • ३१ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आमदार नीलम गोऱ्हे यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट.
  • ९ ऑगस्ट : सकल मराठा समाजाचा औरंगाबादला राज्यातील पहिला मोर्चा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी.
  • २३ सप्टेंबर : सकल मराठा समाजाचा नगरला भव्य मोर्चा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी. 
  • ७ ऑक्‍टोबर : घटनेच्या ८५ व्या दिवशी तीनही आरोपींविरुद्ध ७० साक्षीदारांचा समावेश असलेले ३२० पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्याकडून दाखल.
  • २० डिसेंबर - कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू.
  • १ एप्रिल २०१७ : शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींवर सशस्त्र हल्ला.
  • २४ मे - कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण. ३१ साक्षीदार तपासले, बचाव पक्षातर्फे एका साक्षीदाराची तपासणी.
  • २६ ऑक्टोबर  - अंतिम युक्तिवादास सुरवात.
  • ८ नोव्हेंबर - अंतिम युक्तिवाद संपला.
  • १८ नोव्हेंबर - आरोपींवर दोष सिद्ध. 
  • २१ नोव्हेंबर - आरोपींच्या वकिलांनी बाजू मांडली
  • २२ नोव्हेंबर - शिक्षेबाबत सुनावणी
  • 29 नोव्हेंबर - आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलूमे यांना फाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT