sharad-pawar
sharad-pawar 
महाराष्ट्र

शरद पवार यांची साक्ष नोंदविणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या तपासासाठी नेमलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी चार एप्रिल रोजी उपस्थित राहण्यास एका नोटिशीद्वारे सांगितले आहे. तसेच या तारखेत बदल होणार नाही, अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचेही नमूद केले आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यात नऊ जण सध्या अटकेत आहेत. पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा गुन्हा तपासासाठी ‘एनआयए’कडे सोपवला होता. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने पवार यांना चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर पवार यांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी कुणाला जबाबदार धरले नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पवार यांनी काही विधाने, आरोप केले आहेत. यामुळे कोरेगाव भीमातील दंगलीबाबत पवारांकडे सांगण्यासारखी माहिती असेल, किंवा पुरावे असतील तर त्यांनी ते सांगितल्यास रेकॉर्डवर येण्यास मदत होईल. म्हणून पवार यांनी आयोगापुढे उपस्थित राहावे, अशी मागणी केली होती. आता पवारांकडे जी माहिती असेल ती रेकॉर्डवर येईल, यासाठी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, असे याचिकाकर्ते ॲड. प्रदीप गावडे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT