Koregaon Bhima  esakal
महाराष्ट्र बातम्या

Koregaon Bhima: भिमा कोरेगाव येथे दंगे व्हावे अशी काही जणांची इच्छा; चंद्रकांत पाटलांचा रोख कोणाकडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होतं

रुपेश नामदास

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होतं.

याच पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही घडला. त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर या घटनेवेळी तैनात असणारे 11 पोलिस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

त्यामुळे भिम सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अजून ही रोष पाहिला मिळत आहे. आज भीमा कोरेगाव लढाईचा 205 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भिम अनुयायी येथे मानवंदना देण्यासाठी येतात. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी जाणे टाळले आहे.

पाटील यांना पुन्हा एकदा भीमा कोरेगाव येथील काही जणांनी शाई फेकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते जाणार नाहीत याबद्दल पाटील यांनी माहिती दिली ते म्हणाले की, "भीमा कोरेगाव येथील काही जणांनी शाई फेकण्याचा इशारा दिला आहे, मात्र मी असल्या भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही मात्र लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे आल्याने अशा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावे, दंगे व्हावे अशी काही जणांची इच्छा आहे, त्यामुळे मी माझ्या घरीच आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून विजय स्तंभाला मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

दरवर्षी 1 जानेवारी रोजी, दलित समुदाय 1818 च्या लढाईचा वर्धापन दिन साजरा करतात, ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने दलित सैनिकांसह पुण्याच्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. यानिमित्ताने येथे स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिम अनुयायी हा विजय शोषित समाजाच्या स्वाभिमानाची सुरुवात म्हणून साजरा करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT