महाराष्ट्र

दंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ऍप संदेश चौकशी आयोगासमोर सादर 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले. 

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या. जे. एन. पटेल यांच्या उपस्थितीत साक्ष नोंदविण्यात आली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्यांपैकी शरद दाभाडे या व्यक्तीची साक्ष नोंदविण्यात आली. 

बचाव पक्षाचे वकील बी. जी. बनसोडे यांनी दाभाडे यांची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये दाभाडे यांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आलेल्या संदेशांबाबत ही माहिती दिली. दरम्यान, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना आपण प्रत्यक्षात ओळखत नसून, केवळ छायाचित्रांवरून ओळखतो. तसेच, या घटनेशी माझा कोणताही संबंध नसल्याचे दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, भारिप- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी युक्तिवाद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जबाब घेण्याबाबत आयोगाला अधिकार 
एल्गार परिषदेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेल्या सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार आणि रमेश गायचोर यांनी आयोगासमोर अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलिस महासंचालकांना आयोगासमोर बोलावून, त्यांचे जबाब नोंदविण्याची मागणी केली आहे. यावर कोणाचा जबाब कधी घ्यायचा, हे आयोगाला ठरविण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT