Koregaon Bhima  e sakal
महाराष्ट्र बातम्या

कोरेगाव-भीमा हिंसाचाराची १५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणी, रश्मी शुक्ला यांना समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी (Koregaon Bhima Violence) चौकशी आयोगाने कामासाठी जागा नसल्याचं कारण देत सुनावणी स्थगित केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना योग्य जागा देऊ असे आश्वास दिल्यानंतर पॅनलने शेवटी त्यांच्या सुनावणीचे वेळापत्रक जारी केले. येत्या १५ नोव्हेंबरपासून चौकशी सुरू केली जाणार आहे.

1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारात अनेकजण जखमी झाले होते. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. 2018 मध्ये आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती, परंतु त्याचा कार्यकाळ वारंवार वाढवावा लागला. पुणे ग्रामीणमधील काही साक्षीदार तपासायचे असल्याने या खटल्यातील सुनावणी आतापर्यंत बहुतांशी पुण्यात होत होती. मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या माहिती विभागात तात्पुरती जागा दिलेल्या या आयोगाला काम करणे कठीण जात होते. त्यानंतर मुंबईतील सर्व सुनावण्या स्थगित केल्या होत्या. याबाबत आयोगाने सरकारला एक पत्र लिहून माहिती दिली होती.

28 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत, आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी प्रधान सचिव, गृह, यांना हा मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे न्यावा आणि तातडीने योग्य जागेची व्यवस्था करावी, असे 31 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य सचिव आणि इतर अधिकार्‍यांना लिहलेल्या पत्रात आयोगाचे सचिव व्ही व्ही पालनीटकर म्हणाले होते.

दरम्यान, चौकशी करण्यासाठी आयोगाकडून रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांना समन्स बजावण्यात आले होते. रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना ही हिंसा घडली होती. यावेळी परमबीर सिंह कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना आयोगाने पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT