Sameer Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

आम्हाला जाळून टाकण्याच्या धमक्या येतायेत: क्रांती रेडकर

क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

सुधीर काकडे

आर्यन खान प्रकरणानं गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी वानखेडे यांचा धर्म तसेच त्यांच्या कुटुंबावर देखील आरोप केले. त्यावर वानखेडे यांनी आपण या प्रश्नांना कोर्टामध्ये उत्तर देऊ असे सांगितले होते. आज यासगळ्या प्रकरणावर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मलिक यांच्या आरोपांचे खंडन केले.

क्रांती रेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत पती समीर वानखेडे आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या आरोपांवरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. "कोर्ट सगळ्यात मोठं आहे, त्यांच्यापुढे कुणीही नाही, समीर यांची काम करण्याची पद्धत अनेकांना खटकणारी असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते आहे." क्रांती यांनी यावेळी बोलताना "नेहमी सत्याचा विजय होतो, असं म्हणत समीर या प्रकरणातून बाहेर पडतील" असा विश्वास देखील व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, समीर हे निर्दोष आहे. मला या प्रकरणाचा खूप त्रास झाला. मला माझ्याच महाराष्ट्रामध्ये येवून धमकावतो. मला राज्यात भीती वाटली नाही पाहिजे. याचे मला नवल वाटते, मात्र मला त्याची काहीही काळजी वाटत नाही अंस त्या म्हणाल्या.

पूढे बोलताना त्या म्हणाल्या की, यावेळी मला काहींनी सुरक्षा दिली आहे. आम्हाला ट्रोलिंग केले जात आहे. आम्हाला लटकवून टाकतील याची वाटते भीती, आम्हाला मारण्याची धमकी मिळते आहे असंही त्या म्हणाल्या. अनेकांना समीर वानखेड़े नको आहेत. त्याचे कारणही सगळ्यांना माहिती आहे. समीर फक्त कलाकारांनाच पकडत नाही. त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप केला जातोय तो ही चूकीचा असल्यातं त्यांनी सांगितलं

दरम्यान, पूढे काय होणार याची वाटते भीती वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आता आम्ही सर्व तयारी केली आहे. या प्रकरणाला सामोरं जाण्याची, आमच्याकडे देखील सगळे पुरावे आहेत. वेळ आल्यावर आम्ही ते सगळ्यांसमोर सादर करु. तेव्हा कळेलच हे सारं कुणी केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT