Yasmeen Wankhede Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

जन्माचा दाखला काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला? यास्मिन वानखेडेंचा सवाल

नवाब मलिकांनी कोर्टात येण्याचं आव्हान त्यांनी दिलं.

सुधीर काकडे

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. क्रूझ ड्रग पार्टीवर टाकलेल्या धाडीपासून त्यांचं नाव चर्चेत होतं. त्यांच्यावर आता नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये नवाब मलिक यांनी त्यांच्या परिवराबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले. यास्मिन वानखेडे यांनी आज नवाब मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. यावेळी बोलताना त्यांनी आज मंत्र्यांनी काय नवीन आरोप केला आहे ते मला सांगा...असं म्हणत बोलायला सुरुवात केली.

नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, "त्यांच्याकडे काहीही पुरावे येतात, त्यांच्याक़डे एवढे पुरावे आहेत तर कोर्टात जा की, माध्यमांसमोर का वेळ घालवता असं यास्मिन यावेळी म्हणाल्या. मलिक यांची रिसर्च टीम मोठी आहे. जन्माचा दाखला काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुम्हाला कोणी तुमचा धर्म, जात विचारली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आर्यन खान प्रकरणानं गेल्या काही दिवसांपासून वेगळं वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT