Aadhar Card sakal media
महाराष्ट्र बातम्या

आधारकार्ड अपडेट नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात!

संजीव भागवत

मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या (Scholl education board) अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आधार कार्ड अपडेट (Aadhaar card update) नसलेल्या आणि ज्यांचे आधार कार्डच नाही अशा लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात (lacs of students in educational trouble) सापडलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नाही, अथवा अद्याप आधार कार्ड काढलेले नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून आणि शैक्षणिक लाभांपासून वंचित ठेवण्याचा तुघलकी जीआर (GR announcement) शिक्षण विभागाने काढला असून त्यावर शिक्षक आमदार नागो गाणार (Nago ganar) यांनी आक्षेप घेत हा जीआरच रद्द करण्याची मागणी शिक्षण आयुक्तांसह राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांच्याकडे केली आहे. (lacs of students in educational trouble because of aadhaar card update issue)

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटांच्या बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्ष्ज्ञण देणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणांसाठी बालकांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता येत नाही. अशा स्थितीत शिक्षण विभागाने आपल्या घटनात्मक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, अथवा अपडेट केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश गाह्य धरला जाणार नाही, असे शिक्षण विभागाने काढलेल्या तुघलकी शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे ही बाब संविधानाचा अवमान करणारी असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी असल्याचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी म्हटले आहे.

हे तर खूप मोठे षडयंत्र

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आणि नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. सध्या असलेली यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य न धरण्याचा जीआर काढून लाखो मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू केले असल्याचा आरोपही आमदार गाणार यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT