Ladki Bahin Yojana  esakal
महाराष्ट्र बातम्या

पडताळणीच्या कटकटीमुळे लाडक्या बहिणींचे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज! ई-केवायसी न केल्यास लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. सुरवातीला सात महिने व्यवस्थित लाभ मिळाला, पण फेब्रुवारी २०२५ पासून सतत लाभार्थींची पडताळणी सुरू आहे. आता दोन महिन्यात ई-केवायसी न केल्यास लाभ बंद होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. सुरवातीला सात महिने व्यवस्थित लाभ मिळाला, पण फेब्रुवारी २०२५ पासून सतत योजनेतील लाभार्थींची पडताळणी सुरू आहे. आता दोन महिन्यात ई-केवायसी न केल्यास लाभ बंद होणार आहे. पडताळणीच्या सततच्या कटकटीमुळे हजारो महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करीत आहेत.

विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागले आणि महायुती सरकारला मोठे यश मिळाले. त्यानंतर शासकीय पातळीवरून योजनेच्या निकषांवर बोट ठेवले आणि प्रत्येक निकषांनुसार पडताळणी सुरू झाली. वय, एका कुटुंबातील दोघांनाच लाभ, चारचाकी वाहन, शासकीय दुसऱ्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी या निकषांनुसार पडताळणी झाली आणि सुमारे ४० लाखांहून अधिक महिला लाभासाठी अपात्र ठरल्या.

आता वार्षिक उत्पन्नाच्या निकषांची आगामी काळात पडताळणी होणार असून तूर्तास ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. निवडणुकीनंतर दीड हजार रुपयांचा लाभ अडीच हजार होईल, अशी आशा होती. पण, तेही झाले नाही आणि उलट लाभार्थींमागे पडताळणीचा फेरा लागला. दरम्यान, निराधार योजनेच्या लाभार्थींना दरमहा फिक्स अनुदान वितरित होते, दिव्यांग लाभार्थींना आता ऑक्टोबरपासून २५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा, आम्ही निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे अर्ज केले आहेत.

‘ई-केवायसी’साठी दोन महिन्यांची मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक अपात्र व बोगस लाभार्थींनीही अर्ज भरल्याचे आतापर्यंतच्या पडताळणीत समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक लाभार्थीस ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना स्वत:चे आधारकार्ड व आधारलिंक बॅंक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्यांचा लाभ बंद होणार आहे.

निराधार योजनेसाठी दरमहा सरासरी २००० महिलांचे अर्ज

संजय गांधी निराधार योजनेसाठी अजूनही दरमहा सोलापूर शहर-जिल्ह्यातून सरासरी २००० महिला अर्ज करतात. निराधार योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा १५०० रुपये मिळतात. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार यातील दिव्यांग लाभार्थींना दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या या योजनेकडील महिलांचा कल अधिक आहे.

- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Mane Resigns : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांना मोठा धक्का; मानेंनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, अजितदादांच्या पक्षात करणार प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar Crime: तक्रारदारच निघाला आरोपी; व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी लुटीचा बनाव

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेवांना अभिषेक

Nagpur News: गडकरी प्रमुख पाहुणे असताना स्टेजवर दोन महिला पोस्टमास्टरमध्ये धक्काबुक्की अन् शाब्दीक खटके; नेमकं काय घडलं?

१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

SCROLL FOR NEXT