Ladki Bahin Yojana

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा...

आता निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. लाभार्थींच्या ‘ई-केवायसी’मुळे फेब्रुवारीनंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच तीन महिन्यांचे एकदम ४५०० रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ५६३ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुरवातीला लाभ मिळाला. आता निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांनाच दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. लाभार्थींच्या ‘ई-केवायसी’मुळे फेब्रुवारीनंतर एकाही लाभार्थीस योजनेचा लाभ मिळालेला नाही. आता ‘ई-केवायसी’नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच तीन महिन्यांचे एकदम ४५०० रुपये वितरित होतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना सुरवातीचे पाच-सहा महिने दरमहा लाभ देण्यात आला. पण, जानेवारी-फेब्रुवारी २०२५ पासून प्रत्येक लाभार्थी महिलेची निकषांनुसार पडताळणी सुरू झाली. सुरवातीला सरकारी नोकरदार महिला लाभार्थी वगळले. त्यानंतर महिला व पुरुष एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांची पडताळणी झाली, महिलांच्या नावाप्रमाणे नावे असलेल्या पुरुषांना वगळले. केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेणारे, चारचाकी असलेल्या महिला वगळल्या. आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी ई-केवायसी करण्यात आली.

पण, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक लाख महिलांनी मुदतीत ‘ई-केवायसी’च केली नाही. त्यामुळे पात्र असतानाही त्यांना लाभ बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अर्ज करून एका संधीची मागणी देखील केली आहे. पण, अजून त्यावर निर्णय झालेला नाही. १५ किंवा १६ मे रोजी महिला व बालकल्याण आयुक्त, उपायुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

ई-केवायसी न केलेल्या महिलांचे अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला लाभार्थींची ई-केवायसी चुकली होती, त्याच्या दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. आता ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी राहिली आहे, त्यांनी आमच्या कार्यालयाकडे मुदत मिळावी अशा मागणीचे अर्ज केले आहेत. त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळविली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतूनही अशीच मागणी झालेली आहे.

- अविनाश मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

आदेश दरमहा १० तारखेपूर्वी लाभाचा अन्‌...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २८ जून २०२४ रोजी शासन निर्णय झाला. त्यात दरमहा १० तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यात लाभ वितरित करण्याचे ठरले. पण, लाभार्थींना बहुतेकवेळा त्या तारखेला लाभ मिळालाच नाही. आता तर तीन महिने झाले, महिलांना लाभाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीचा आज निकाल, अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरु! ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भरता येणार १० कॉलेजचे प्राधान्यक्रम, वाचा...

सोलापुरात वाढदिवसाच्या पार्टीवरून येताना भीषण अपघात! बर्थडे बॉयसह 3 मित्र ठार; महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला अडकला कारचा दरवाजा, कार १५० फूट फरफटत गेली अन्‌...

IPL 2026 Point Table: लखनौ सुपर जायंट्सचा विजय! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का, PlayOff चे गणित बनले अधिक मजेशीर

प्रापर्टीसाठी वहिनी, पुतण्या, पुतणीचा खून! बोरामणीतील मुख्य सूत्रधार १.५० लाख रुपये घेऊन पसार, ५ दिवसांत ४००० किमी प्रवास, बांगलादेशात जाण्याचा होता प्लॅन, पण...

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

SCROLL FOR NEXT