सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील साडेअकरा लाख तर राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांना आतापर्यंत प्रत्येकी सहा हप्ते (९००० रुपये) मिळाले आहेत. पण, त्यात अपात्र असताना देखील अर्ज केलेल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांच्यासाठी अपात्र असतानाही अर्ज केलेल्यांना स्वत:हून अर्ज करण्यासाठी शासनाने पोर्टल पुन्हा खुले केले असून, त्यावर अपात्र लाडक्या बहिणींना लाभ बंद करण्याचा अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत जवळपास अकराशेहून अधिक लाडक्या बहिणींनी त्यावर अर्ज केले आहेत.
राज्य सरकारला दरमहा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार ७५० कोटी रुपये द्यावे लागत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील त्रुटींवर आता बोट ठेवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत देखील सचिवांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. योजनेचे पोर्टल पुन्हा खुले करून देण्यात आले असून, त्यावर १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त अर्जांची पडताळणी करून त्याला मंजुरी देणे, ज्यांनी लाभ नको म्हणून अर्ज केले, त्यांच्या अर्जांची पडताळणी करून त्यावर निर्णय घेणे अशा सूचनांचा त्यात समावेश आहे. पण, त्या लाभार्थींना पूर्वी घेतलेल्या लाभाची संपूर्ण रक्कम परत करावी लागणार असून, त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार केले आहे. पण, त्या लेखाशीर्षमधील रक्कम ट्रेझरीला संलग्नित नसल्याने पैसे जमा करण्यास अडचणी येत आहेत. तो प्रश्न दूर झाल्यावर लाभ नको म्हणणाऱ्या महिलांना आतापर्यंतच्या लाभाची रक्कम त्यावर भरावी लागण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन संकेतस्थळावरुन करता येईल अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र नसताना देखील ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनी स्वत:हून लाभासाठी पात्र नसल्याचे योजनेच्या संकेतस्थळावरील ‘तक्रार निवारण’ या पर्यायात ऑनलाइन भरून द्यायचे आहे. पुढे त्यांना आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम जमा करावी लागू शकते. आतापर्यंत आमच्या कार्यालयाकडे काहींचे अर्ज प्राप्त झाले असून त्यांनी योजनेचा लाभ नको म्हणून लेखी दिले आहे.
- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
लाभ नको म्हणणारे अर्जदार म्हणतात...
अपात्र असूनही किंवा आता अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वत:हून लाभ नाकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना तसा अर्ज करायचा आहे त्यांना तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, या ठिकाणी लेखी अर्ज करता येईल. याशिवाय https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘तक्रार निवारण’ हा पर्याय निवडून त्यावरूनही अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात काहीतरी कारवाई होऊ शकते म्हणून अनेकांनी माझे वार्षिक उत्पन्न वाढले आहे, मला नोकरी लागली आहे, माझ्याकडून किंवा कुटुंबीयांकडून चुकीने अर्ज भरला गेला, अशी कारणे देत लाभ नको म्हणून अर्ज केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.