Maharashtra Women and Child Development Minister Aditi Tatkare addresses the Assembly, clarifying eligibility criteria for the Ladki Bahin Yojana.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: मंत्री आदिती तटकरे यांनीच विधिमंडळात दिली माहिती; जाणून घ्या, नेमकं कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही?

Mayur Ratnaparkhe

Latest Government Update on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या लाडकी  बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. खरंतर या योजनेवरून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांममध्ये आरोप-प्रत्यारोप, वाद-प्रतिवाद सुरू असतात. महायुतीला सत्तेत आणण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांपैकी एक असणाऱ्य या योजनेवरून विरोधातील महाविकास आघाडी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत असते. तर वेळोवेळी याबाबत सरकारकडूनही अपडेट दिले जातात.

आता अशी माहिती समोर आली आहे की, २ हजार २८९ महिला ज्या सरकारी कर्मचारी होत्या, त्यांना लाडकी बहीण योजने अतंर्गत लाभ देणे बंद केले गेले आहे. राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत ही माहिती दिली आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने केलेल्या पडताळणीत आढळले आहे की, २ हजार २८९ महिला सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या. त्या सर्व महिलांची ओळख पटली आहे आणि आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे.

या महिलांना लाभ मिळणार नाही -

ज्या महिला आधीपासून अन्य योजना जसे की, संजय गांधी निराधार योजना(दोन लाख महिला), नमो किसान योजना(७.७०लाख महिला) जुडलेल्या आहेत. ज्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत, आता यातील संख्या ५० हजारांपर्यंत जाऊ शकते.

तसेच, सरकारचे म्हणणे आहे की, सरकारी विभागांमध्ये ज्या महिला कार्यरत आहेत, त्यांनी तत्काळ लाडकी बहीण योजनेतून मिळालेले हप्ते परत करावेत अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई होईल. कारण, या योजनेचा नियमच आहे की सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

याशिवाय, अशा महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे. २५ लाख महिला आहेत, ज्यांची छाननी केली जात आहे. तसेच अन्य कारणांमुळे अयोग्य आढळलेल्या १५ लाखांपेक्षा अधिक महिलांचीही छाननी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT