ajit pawar sanvad yatra esakal
महाराष्ट्र बातम्या

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतला 'मुख्यमंत्री' शब्द गायब! अजित पवार गटाकडून गाण्याचा Video लाँच, वाद उद्भवण्याची शक्यता

CM Eknath shinde: महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातदेखील योजनेच्या श्रेयावरुन तू-तू..मैं-मैं सुरु असल्याचं दिसून येतंय. अजित पवार अर्थमंत्री असल्याने प्रत्येक भाषणात ते योजनेवरुन भरभरुन बोलत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारचे प्रमुख म्हणून योजनेला प्रसिद्धी देतायत.

संतोष कानडे

Ajit Pawar Latest News: राज्यामध्ये सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचीच चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षांनी ही महत्त्वाकांक्षी योजना लाँच केल्याचं राजकीय जाणकार सांगतात. मात्र या योजनेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातदेखील योजनेच्या श्रेयावरुन तू-तू..मैं-मैं सुरु असल्याचं दिसून येतंय. अजित पवार अर्थमंत्री असल्याने प्रत्येक भाषणात ते योजनेवरुन भरभरुन बोलत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारचे प्रमुख म्हणून योजनेला प्रसिद्धी देतायत.

त्यातच आता अजित पवार गटाकडून लाँच करण्यात आलेल्या गाण्यामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेचा उल्लेख केवळ 'माझी लाडकी बहीण योजना' असा करण्यात आलेला आहे. पक्षाचं गाणं असल्यामुळे गाण्यामध्ये अजित पवारांची भलामण केलेली दिसतेय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सगळे मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिंडोरीतून यात्रेची सुरुवात होणार आहे.

असा असेल गुरुवारचा कार्यक्रम

सकाळी १० वाजता ओझर विमानतळावर नेत्यांच आगमन होणार

११ वाजता - न्यू कम्युनिटी हॅाल, दिंडोरी येथे जनतेशी संवाद

१ वाजता - सह्याद्री फार्म येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

३ वाजता - पंचवटी येथील काळाराम मंदिरात पूजा

४ वाजता - देवळाली येथे लाडक्या बहीणींसोबत संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

SCROLL FOR NEXT