Lalit Patil Drugs Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलचा आणखी एक कारनामा आला समोर, जेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी केला ड्रामा? VIDEO

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला ड्रग माफिया ललित पाटील यांचे जुने काही व्हिडीओ समोर आले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला ड्रग माफिया ललित पाटील यांचे जुने काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहे. ललित पाटीलसोबत ड्रग प्रकरणात अनेकांचा समावेश असण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आतापर्यंत १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ललित पाटीलचे काही सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. ललित पाटीलला जेव्हा २०१९ मध्ये अटक झाली होती, त्यानंतर तो येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. मात्र तेथून तो रुग्णालयात कसा पोहोचला याबाबतचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

ललित पाटील आजारपणाचे नाटक करत असतानाचा तो व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ २०२० मधील आहे. ललित पाटीलला ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला हिंजवडी पोलिस ठाण्यात आणण्यात आलं होतं. हिंजवडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ललितने आजारपणाचं नाटक केलं. पोलीस स्टेशनच्या जिन्यावरून उतरताना पडण्याचं नाटक ललितने केलं होतं, हे आता निष्पन्न होत आहे.

या सीसीटीव्ही फुटेज ललितच्या पायाला पट्टी बांधलेली दिसत आहे. जिन्यावरुन उतरताना ललित पडताना दिसत आहे. यावेळी त्याला दुखापत झाल्याचं त्याने भासवलं आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे दुसऱ्याच दिवशी त्याला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime News: प्रेमसंबंधातून पतीची हत्या! दारू पाजून रॉडने हल्ल्यानंतर ओढणीने नाक-तोंड दाबले, पत्नीनेच रचले षडयंत्र

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

Success Story: बिहारच्या मातीतून निघाला, राजदरबारात पोहोचला; शेफ नंदकिशोर यादव यांची २५ वर्षांची प्रेरणादायी कहाणी

Marathi News Live Updates : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी; आज पहिला दौरा

Maharashtra Revenue Officers Transfer: महसूल विभागातील ‘त्या’ ४० अधिकाऱ्यांची लवकरच बदली

SCROLL FOR NEXT