Lalit Patil Drugs Case 
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करणार गौप्यस्फोट?

Sandip Kapde

Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद घेणार आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी होत असलेल्या आरोपाबाबत देवेंद्र फडणवीस सविस्तर बोलणार असून मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ललित पाटील सापडला आहे, राज्यातील ड्रग्ज प्रकरणात एक मोठं रॅकेट समोर येणार, अनेक गौप्यस्फोट होणार तसेच आरोप करणाऱ्यांची तोंड बंद होणार, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीस कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ललित पाटील प्रकरणी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज गौप्यस्फोट करण्याती शक्यता आहे. 

ललित पाटील संदर्भात राज्य सराकर आणि त्यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील मंत्री दादा भूसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते. या मंत्र्यांबाबत देखील कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. बैठकीत या मंत्र्यांची चुप्पी होती अशी माहिती देखील सामने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ललित पाटील मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. या दरम्यान त्याची चौकशी देखील करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT