Lalit Patil Drug Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil : 'ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण', जामिनासाठी वकिलांची कोर्टात धाव

'Lalit Patil's friend Pragya Kamble is mentally ill', lawyers run to court for bail...

संतोष कानडे

पुणेः ड्रग्ज माफिया ललित पाटील याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याच्या दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. प्रज्ञावर मानसिक उपचार सुरु असून तिला जामीन द्यावा, यासाठी कोर्टाकडे अर्ज करण्यात आलेला आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहे, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर केले. सध्या प्रज्ञा पोलिस कोठडीत असून तिच्या जामिनासाठी वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

प्रज्ञा कांबळेवर २०१९ पासून उपचार सुरू असल्याचे अर्जामध्ये नमूद केले आहे. शिवाय अर्जाची पुष्टी करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात आले आहे. ससून रुग्णालयातून पळून जाण्यापूर्वी ललित त्याच्या मैत्रिणी अर्चना, प्रज्ञा यांना भेटला होता, दोन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांनी त्याला २५ लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT