महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case:ससून रुग्णालयाच्या डीनचं निलंबन करा ! रवींद्र धंगेकरांची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ललित पाटील याचे मैत्रिणीसोबत फोटो व्हायरल झाले. त्याानंतर रवींद्र धंगेकरांक़डून डीनच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.

Manoj Bhalerao

Lalit Patil Drugs Case: ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला अटक केल्यानंतर, त्याला मदत करणाऱ्या दोन मैत्रिंणींनाही अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.

काँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या डीनवर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसं पत्रही लिहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाच्या डीनला निलंबित करावं, अशी मागणी केली. याआधी देखील धंगेकरांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करत , या ड्रग्ज प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडून पत्राद्वारे करण्यात आली. ललित पाटील आणि त्याच्या मैत्रिणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाले.

ललित पाटील याला काही दिवसांपुर्वी बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने मीडियाला सांगितलं होतं की तो ससूनमधून पळाला नसून त्याला पळवण्यात आलं आहे. त्यानंतर ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांच्या भुमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जेव्हा ललितला बंगळूरमधून अटक करण्यात आली, तेव्हा त्याला पळवण्यात त्याच्या दोन मैत्रिणींचा समावेश असल्याची माहिती देखील मिळाली. त्यानंतर त्या दोन मैत्रिणींना अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT