lalit patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil : ललित पाटील 'ड्रग्ज'प्रकरणी ससून रुग्णालयातील एका अधिकाऱ्याचा राजीनामा

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून रुग्णालयातील एका अधिकाऱ्याचा राजीनामा...

सकाळ डिजिटल टीम

पुणेः मागील काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. ललित पाटील सुरुवातीला ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता हे प्रकरण अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

ललित पाटील नाशिकमध्ये चक्क ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत होता. त्याच्या भाऊ आणि साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. खुद्द ससून रुग्णालयाचे डीन त्याच्यावर उपचार करत असल्याचं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं होतं.

या प्रकरणी सोमवारी ससून रुग्णायातील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. ससून रुग्णालयाच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनी हा राजीनामा दिला. ललित पाटील प्रकरणात ते संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे डॉक्टर सुजित धीवारे यांनी राजीनामा दिला.

ससून प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर सुधीर यांनी राजीनामा दिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. २७ सप्टेंबर रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता धीवारे यांनी राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणी आणखी किती अधिकाऱ्यांचे बळी जातात, हे बघावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT