महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case: "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये आणण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

Serious accusation of Sushma Andahar: ड्रग्ज माफिया असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांचं नाव समोर आलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भुसे यांनी फोन करुन ललित पाटीलला ससूनमध्ये पाठवण्यास सांगितल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Lalit Patil Drugs Case Shivsena MLA Dada Bhuse name enters Sushma Andhare serious allegations)

सुषमा अंधारे म्हणाल्या, "काल नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली तसेच काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी देखील सकाळी सांगितलं की या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचा हात आहे. म्हणजेच याची माहिती सर्वांना आहे, पण नाव कोणी घेतलं नव्हतं.

पण मी थेट नाव घेताना सांगते की, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाभोवती संशयाचं धुकं असेल तर त्यांचे कॉलरेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत? त्यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? जर गृहखात्याची खरंच इच्छाशक्ती असेल की या प्रकरणाचा छडा लावायची तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा" (Marathi Tajya Batmya)

आमची शंका दादा भुसेंवर - अंधारे

या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं कारण ललित पाटील याला ससूनमध्ये अॅडमिट करुन घ्यायला प्रशासन उदासिन होतं. पण तरीही प्रशासनावर त्याला अॅडमिट करुन घेण्यासाठी दबाव टाकला गेला. हा दबाव कोणत्या आमदारानं टाकला? कोणाच्या फोनवरुन दबाव टाकला? हे तपासलं पाहिजे. आमची शंका दाद भुसे यांच्यावर आहे. त्यामुळं आम्ही थेट नाव घेत आहोत त्यांचं. (Latest Marathi News)

अधिवेशनात आवाज उठवणार

या सर्व संबंधात अधिवेशनात ललित पाटील, आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचा मुद्दा येईल. या क्षणाला राज्यात आरोग्य व्यवस्था, गृहव्यवस्थेचे तीनतेरा झालेले आहेत. हे दोन्ही विषय आम्ही लावून धरु आणि या दोन मुद्द्यांवर ठाम असू, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT