land will be measured sakal
महाराष्ट्र बातम्या

जमिनीची मोजणी आता अवघ्या २०० रुपयांत! ९० दिवसांत होणार मोजणी, अर्जासोबत संमतीपत्र, एकत्र कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक; अर्ज कोठे, कसा करायचा? वाचा...

जमिनीच्या मोजणीसाठी आता वडिलोपार्जित एकाच कुटुंबातील पोटहिश्श्याची मोजणी ९० दिवसांत होणार आहे. त्यासाठी अवघे २०० रुपयेच लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून या मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांची संमती बंधनकारक आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जमिनीच्या मोजणीसाठी आता वडिलोपार्जित एकाच कुटुंबातील पोटहिश्श्याची मोजणी ९० दिवसांत होणार आहे. त्यासाठी अवघे २०० रुपयेच लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून या मोजणीसाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांची संमती बंधनकारक आहे.

सोलापूरसह राज्यभरात जमिनीचा बांध, हद्दीतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये दरवर्षी सरासरी ६०० गुन्हे जमिनीच्या वादातूनच घडल्याची नोंद पोलिसांत आहे. हे वाद कायमचे मिटावेत यासाठी शासनाने आता जमिनीच्या मोजणीसाठी दोनच प्रकार ठेवले असून त्यानुसार ३० ते ९० दिवसांत अर्जदारांचे क्षेत्र मोजून दिले जाते. आता २०० रुपयांत एकाच कुटुंबाच्या सातबारावरील पोटहिश्श्याची मोजणीसाठी तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करावा लागेल.

अर्जासोबत सातबारा उतारा, उताऱ्यावरील सर्वांचे संमतिपत्र आणि तहसील कार्यालयातील एक कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या मोजणीसाठी अर्ज केल्यावर संबंधित कुटुंबास किंवा अर्जदारास द्रुतगती मोजणीसाठी आग्रह धरता येणार नाही. त्यांची मोजणी नियमित पद्धतीने ९० दिवसांत होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सरासरी साडेसात हजार शेतकरी दरवर्षी जमिनीची मोजणी करून घेतात, हे भूमिअभिलेख कार्यालयाकडील अर्जांवरून स्पष्ट होते.

सध्या मोजणीसाठी शुल्क किती?

ग्रामीण भागातील जमिनीच्या नियमित मोजणीसाठी हेक्टरी दोन हजार रुपयांचे शुल्क आहे. तर शहरी हद्दीतील तेवढ्याच जमिनीच्या मोजणीसाठी एक हजार रुपये जादा द्यावे लागतात. नियमित मोजणीसाठी ९० दिवसांचा कालावधी असतो. दुसरीकडे द्रुतगती मोजणी ३० दिवसांत केली जाते. नियमित मोजणी शुल्काच्या चौपट शुल्क द्रुतगती मोजणीसाठी द्यावी लागते. मात्र, एकाच कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीतील पोटहिश्श्यांची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार आहे.

२०० रुपयांत मोजणीची कार्यवाही सुरु

जमिनीची मोजणी आता नियमित व द्रुतगती या दोन प्रकारे होते. त्यासाठी शहरी व ग्रामीण हद्दीतील जमिनींच्या मोजणीकरिता हेक्टरी दोन ते १२ हजार रुपयांपर्यंत शुल्क शासनाने निश्चित केले आहे. पण, आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार एकाच कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी २०० रुपयांत केली जाणार आहे.

- दादासाहेब घोडके, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: नितीश कुमारांचा मुलगा होणार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री भाजपचा? पक्षाच्या मोठ्या नेत्याने दिले 'हे' संकेत

Virat Kohli : कोहलीने Puma सोबतचा करार संपवला; आता नव्या भारतीय कंपनीसोबत 40 कोटींची नवी इनिंग सुरू!

Latest Marathi News Live Update : येवला तालुक्यातील उंदीरवाडी शिवारात बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Password Psychology: लोक एक्सच्या नावाचा पासवर्ड का ठेवतात? मानसशास्त्र सांगतं ३ मोठी कारणं

'बच्चे बडे हो जाते हैं, लीग खतम नही होती!' Wasim Akram ची आयपीएल वेळापत्रकावर टीका; म्हणाला, PSL No. 1

SCROLL FOR NEXT