NCP Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : गायी विकून जमिनी घेतल्या; अजित पवारांनी सांगितल्या जुन्या आठवणी

सकाळ डिजिटल टीम

बारामतीः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बारामती येथील कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा दिला. दूध व्यवसाय, जमीन खरेदी, कौटुंबिक आठवणी; या विषयांवर अजित पवार भरभरुन बोलले.

बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीने उभारलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन तसेच देवा मोटर्स व केएफसी फुड सेंटरचे उद्घाटन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

यावेळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, उपाध्यक्ष मनोज पोतेकर, सचिन सातव, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे, संभाजी होळकर, जय पाटील, चेतन शहा वाल्हेकर, अविनाश लगड, संजय संघवी, पौर्णिमा तावरे, संग्राम सोरटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी दूधाच्या व्यवसायातून पुढे आलेलो आहे. वडिलांच्या निधनानंतर दुधामुळे आपलं बस्तान बसलं. त्यावेळी एक गाय साडेसात हजार रुपयांना मी विकायचो आणि एक एक्कर जमीन घ्यायचो. जमिनीचे दर तेव्हा कमी होते, अशी आठवण त्यांनी सांगितलं.

कुटुंबाबद्दल बोलतांना पवार म्हणाले...

आज आमच्या मातोश्रींना 86 वर्षे पूर्ण होत आहेत. उद्या धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे साठ वर्षे पूर्ण करून 61 व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. आपले धाकटे बंधू रणजित पवार यांची दाढी व केस पांढरे शुभ्र आहेत तर माझे केस काळे आहेत, पण हा फक्त रंगाचा परिणाम आहे बाकी काही नाही, अशी मिश्किल टिप्पणी करत काळ वेळ कोणासाठी थांबत नाही असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT