Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यातील सर्वात मोठे ऑपरेशन? नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटींचा चुरडा 'सामना'तून गंभीर आरोप

ठाकरे गटाकडुन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वारंवार पक्ष फोडाफोडीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. आता ठाकरे गटाकडुन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पालिकेच्या निधीतूनच हा खर्च करण्यात आला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी येत्या काळात पाण्याची समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतीत आहे. या विषयावरूनही दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यातील सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ‘सामना’तील अग्रलेखातून गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पालिकेच्या निधीतूनच हा खर्च करण्यात आला आहे, असंही म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्यातील एखाद्या पालिकेतील नगरसेवक फोडण्याचं हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर आमदारांवर नगरविकास खात्याने उधळपट्टी सुरू केली आहे. ती थांबवून तोच पैसा दुष्काळ निवारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जगवण्यासाठी वाचवण्याचा सल्लाही अग्रलेखाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT