11th Admission Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केला आहे. अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. सोमवारी (ता. २५) प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केला आहे. अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. सोमवारी (ता. २५) प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होणार आहेत.

इयत्ता अकरावी प्रवेशाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीपासून ते जागा निश्चितीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. शाळा, महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार काटेकोरपणे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी वेळेत सर्व टप्पे पूर्ण करून शैक्षणिक प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. अंतिम टप्प्याचे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केले आहे.

अंतिम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • रिक्त जागांची घोषणा : २५ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. सर्व महाविद्यालयांतील उपलब्ध रिक्त जागांची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी व पालकांनी ती तपासून पर्यायाचे मूल्यांकन करावे.

  • जागा वाटप : २६ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या पर्यायांनुसार संगणकीय पद्धतीने जागा वाटप होतील. विद्यार्थ्यांना मेरिट क्रमांक व कटऑफनुसार जागा मिळेल.

  • कटऑफ लिस्ट व निकाल : २९ ऑगस्टला सकाळी आठ वाजता प्रत्येक महाविद्यालयेनुसार कटऑफ लिस्ट प्रकाशित होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’ जाईल. शाळा व महाविद्यालये यादी नोटीस बोर्डवर लावतील.

  • प्रवेश निश्चिती : २९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी आपल्या Log-in मध्ये जाऊन प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती तपासावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व महाविद्यालयात पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.

  • शाळा व महाविद्यालयांना निर्देश : रिक्त जागांची योग्य व पारदर्शक नोंद पोर्टलवर करणे. कटऑफ लिस्ट विद्यार्थ्यांना व पालकांना वेळेत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांची कागदपत्रे काटेकोरपणे तपासूनच प्रवेश निश्चित करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT