devendra fadanvis 
महाराष्ट्र बातम्या

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जप्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष; माहिती अधिकारातून आलं समोर

अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता

कार्तिक पुजारी

जालना- अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते, असं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिलीये. (Lathi charge on Maratha protesters in antarwali sarati not ordered by home minister Devendra Fadnavis Information came from the RTI)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समूदायाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु होते. यावेळी कथितरित्या आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे राज्यभरातून संतापाची लाट निर्माण झाली. लाठीचार्जचा आदेश देणारे पोलिस आणि सरकारमधील मंत्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरली होती. त्यानंतर सरकारकडून काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर टीका होऊ लागल्याने त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. लाठीचार्ज व्हायला नको होता, असं ते म्हणाले होते. लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला होता, असं फडणवीस म्हणाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT