Gautami Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil: कोल्हापूरकरांच्या हृदयातली लावणी क्वीन गौतमी पाटील आहे तरी कोण...

संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर अनेक जण प्रसिद्धीसाठी काही हटके व्हिडीओ तयार करत असतात. काही व्हिडीओना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळते आणि ते एका रात्रीत स्टार होऊन जातात. अशाच एका लावणी सम्राज्ञीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तीचं नाव आहे, गौतमा पाटील मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील ही गौतमी गाण्यांवर बेभान होऊन डान्स करत असल्याचं दिसतं.

संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचं समजते. आपल्या नृत्यातून लोकांच्या मनावर अधिराज्या गाजवणाऱ्या गौतमीला अनेक कार्यक्रमात डान्स करण्यासाठी बोलवलं जातं,आणि त्यासाठी तिला मानधन देखील दिलं जातं. गौतमी मुळची कोल्हापुरची आहे आणि ती 26 वर्षाची आहे. परंतू या व्यतिरिक्त गौतमीची फारशी माहितीसमोर आलेली नाही. गौतमी कोल्हापूरची असली तरी तिचं गाव, तिचं शिक्षण, तिचे आई-वडिल, याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही.

गौतमी पाटीला एका वादग्रस्त इशाऱ्यामुळं अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागले होते. तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिने सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी गाण्यावर विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून नाचताना दिसत होती. यावर सर्व क्षेत्रातून तिखट शब्दात प्रतिक्रियी आल्या होत्या. मेघा घाडगे यांनीही गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली होती. त्यानंतर गौतमीने सर्वांची माफी देखील मागीतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT