Sulochana Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

Sulochana Chavan: तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा... या गाण्याचा ठसकाच निराळा होता

संतोष कानडे

मुंबईः साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज शनिवार 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'लावणीसम्राज्ञी' अशी ओळख मिळालेल्या सुलोचनाबाईंनी शेकडो गाणे गायले. रसिकांच्या मनावर त्यांच्या ठसकेबाज लावण्या अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्यांची गाणी कुठेना कुठे कानावर येतातच.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

''फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा'' या गाण्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. आजही हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात आहे. ग.दि. माडगूळकर यांचं हे गीत असून वसंत पवार यांचं संगीत आहे. तर ठसकेबाज आणि बहारदार स्वर दिलेत सुलोचना चव्हाण यांनी.

सुलोचना चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने बोर्डावरची लावणी माजघरात आणली. त्यांचा यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुंबईतल्या गिरगाव येथे झाला. विवाहापूर्वी त्यांचं नाव सुलोचना महादेव कदम असं होतं. त्यांनी मराठीसह हिंदी, गुजराती आणि उर्दू भाषेतल्या नाटकांत भूमिका केल्या होत्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना गायनाला सुरुवता केली. लग्नापूर्वीच त्यांनी ७० हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केलं. त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्येही गाणी गायिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT