solapur zp ceo manisha awhale  sakal
महाराष्ट्र बातम्या

पेपर तपासणीत हलगर्जीपणा झेडपी शिक्षकांना येणार अंगलट! सीईओंच्या सक्त सूचना; 10 ते 12 जुलैदरम्यान पायाभूत चाचणी; इयत्ता तिसरीपासून विद्यार्थ्यांनी पेनचा वापर करावा

पायाभूत चाचणीच्या १० टक्के पेपरची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने गतवर्षापासूनच घेतला आहे. यंदाही त्याचप्रकारे पेपर तपासणी होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : पायाभूत चाचणीच्या १० टक्के पेपरची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने गतवर्षापासूनच घेतला आहे. यंदाही त्याचप्रकारे पेपर तपासणी होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी निर्णयही घेतले आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही परीक्षा आयोजिली आहे. त्यात पायाभूत चाचणी संकलित एक व दोन या परीक्षा घेतल्या जातात. गत शैक्षणिक वर्षात संकलित चाचणी दोन ही परीक्षा एप्रिलमध्ये घेतली होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी शाळांना भेटी देऊन केलेल्या तपासणीत संकलित चाचणी दोनच्या पेपर तपासणीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पेपर तपासणीचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला आणि प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ६० शाळांना भेटी देऊन संकलित चाचणी दोनच्या पेपर तपासणीची पडताळणी करून त्यांना अहवाल दिला होता. त्यात विद्यार्थ्यांनी पेन्सिलने उत्तर लिहिल्याचे, शिक्षकांनी पेन्सिलने पेपर तपासणी केल्याचे, काटेकोरपणे गुणदान न केल्याचे, उत्तरे खाडाखोड करून पुन्हा लिहिल्याचे, व्याकरणदृष्ट्या चुकीच्या वाक्यांना गुण दिल्याच्या बाबी समोर आल्या होत्या. यंदा पॕटअंतर्गत १० ते १२ जुलै या कालावधीत पायाभूत चाचणी आयोजिली आहे. त्यात पेपर कशा प्रकारे तपासावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे सर्व शिक्षकांना पुढील सूचना देणार आहेत.

सीईओंच्या पेपर तपासणीबाबत सूचना...

  • इयत्ता तिसरीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पेनचा वापर करावा

  • शिक्षकांनी लाल पेननेच पेपर तपासावे

  • शिक्षकांनी सर्व पेपर्सची वस्तुनिष्ठपणे तपासणी करावी

  • केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दहा टक्के पेपर तपासणीची फेरपडताळणी करावी

  • पेपर तपासणीनंतर शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी

केंद्रप्रमुखांनी कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करावे

गतवर्षापासूनच पायाभूत चाचणीच्या पेपर तपासणीला सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरात पायाभूत चाचणीचे १० टक्के पेपर तपासणीचे आदेश दिले आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीमध्ये प्रश्ननिहाय व उपप्रश्ननिहाय गुणदान करावे. अर्ध्या चुकीच्या उत्तराला अर्धा गुण देऊ नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी एकमेकांचे बघून लिहू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. केंद्रप्रमुखांनी शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT