Uddhav Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ३५ वर्षापासून नगरसेवक असलेल्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक खिंडार

अंकिता खाणे (Ankita Khane)

Uddhav Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी राज्यात दौरे करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि ३५ वर्षापासून नगरसेवक असलेले गजानन बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी गजानन बारवाल यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. ३५ वर्षापासून नगरसेवक असलेले गजानन बारवाल यांच्या शिवसेनेत प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

गजानन बारवाल यांनी आज सकाळी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची भेट घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून गजानन बारवाल उमेदवार होते. शिवसेनेत बंड झाल्यापासून उध्दव ठाकरे यांना मोठे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची, नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.

आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. बैठका, दौरे यांचे नियोजन केले आहे. अशातच उध्दव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये उद्धव ठाकरेंची देखील चिंता वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT