Legal expert Ulhas Bapat matoshree Uddhav Thackeray Cm Eknath Shinde Maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे बाजी पलटवणार? कायदेतज्ञ उल्हास बापट थेट मातोश्रीवर

शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल जाहीर केला. दरम्यान, कायदेतज्ञ उल्हास बापट थेट मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कायदेतज्ञ बापट मातोश्रीवर दाखल झाल्याने अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. (Legal expert Ulhas Bapat matoshree Uddhav Thackeray Cm Eknath Shinde Maharashtra Politics )

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेल्यानंतर उद्धव ठाकरे पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच त्यांनी कायदेतज्ञ उल्हास बापट यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

दोघांच्या फोनवरील चर्चनंतर उल्हास बापट मातोश्रीवर दाखल झाले आहेत. दोघांमध्ये काही तास चर्चा झाली. मात्र, काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आज उद्धव ठाकरे यांनी कायदेतज्ञ तसेच काही वकिलांची मुंबईत बैठक बोलावली होती. कायद्याच्या संदर्भात अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी उद्धव ठाकरे यांनी उल्हास बापट यांना बोलावले होते. अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT