Vidhan Bhavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

New Vidhan Bhavan : नव्या संसद भवनाप्रमाणे नवीन विधीमंडळ उभं राहणार; विधानसभा अध्यक्ष प्रस्ताव देणार

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं. आता महाराष्ट्रातही नवीन विधानभवन बांधण्यात येण्याची शक्यता आहे.

संतोष कानडे

मुंबईः नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं. आता महाराष्ट्रातही नवीन विधानभवन बांधण्यात येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी तसा प्रस्ताव दिलेला आहे.

नव्या संसद भवनाप्रमाणे राज्यात नवं विधीमंडळ बांधलं जावू शकतं. सध्याच्या विधीमंडळ पार्किंग जागेतच नवे विधीमंडळ बांधण्याचा विचार असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच देणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

संभाव्य विधीमंडळात आमदारांच्या आसन व्यवस्था वाढवण्याचा विचार असून भविष्यातील आमदार संख्या व कामकाजाचा विचार करून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं, असं विरोधी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT