Legislative Council election Voting esakal
महाराष्ट्र बातम्या

कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही : न्यायालय

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे लोकनियुक्त आमदार असून त्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र, सर्वच आमदारांची कार्य आणि कर्तव्ये ही कायद्याने नियंत्रित आहेत आणि संसदेकडून कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात हे तत्त्व लागू होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी करणारी याचिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात केली होती. दोन्ही याचिका न्या. निजामुद्दीन जमादार यांनी गुरुवारी फेटाळल्या असून मलिक आणि देशमुख यांना मतदान करण्याचा अधिकार नाकारला आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत, अविश्वासाच्या ठरावासाठी मतदान करण्याचा, तसेच निवडणुकीला उभे राहण्याचा कारागृहात असलेल्या आमदारांना अधिकार आहे. या प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ६२(५) लागू होत नाही. या कलमाद्वारे कोणत्याही प्रकारच्या कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT