Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक होऊ द्या! शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागातून भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरांवर निशाणा साधला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पक्षफुटीनंतर आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सातत्यानं बंडखोरांवर आणि भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसिद्ध झालाय. यातून उद्धव यांनी पुन्हा एकदा फटकेबाजी केली. तसेच एकदा निवडणुका होऊन जाऊ द्या, पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Let there be an election Shiv Senas CM will be again says Uddhav Thackeray)

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार? जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. शिवसेनाप्रमुखांचं वचन आजही कायम आहे. मी पण शिवसैनिकचं आहे पण मी मुख्यमंत्री होणार असं कधीही म्हणालो नव्हतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची वचनपूर्ती झाली, पण तरीही मी गप्प बसणार नाहीए. कारण मला शिवसेना वाढवायची आहे. जर मला शिवसेना वाढवायची नसेल तर माझा पक्ष प्रमुख असण्याचा उपयोग काय? शिवसेनेचं तुफान कायम आहे. लोकांच्या मनात, हृदयात कायम आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचं तुफान येईल.

मराठी माणूस, शिवसेना, मुंबईचं भविष्य काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. सध्या मुंबई महापालिकेवर जो भगवा फडकत आहे तोच भगवा पुन्हा फडकेल. यापूर्वी अनेकांनी म्हटलंय की शिवसेना निवडुकीनंतर राहणार की नाही? पण मुंबईकर आता एकत्र आले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहताहेत. त्यामुळं माझंही मत आहे की मुंबई पालिकेच्याच नव्हे तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT