sadabhau khot esakal
महाराष्ट्र बातम्या

"पवारांचं आडनाव बदलून आगलावे करा"; सदाभाऊंची शरद पवारांवर सडकून टीका

शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. "पवारांचं आडनाव बदलून आगलावे करावं", असं सदाभाऊंनी म्हटलं आहे. (Lets change Pawar Surname as Aaglawe Sadabhau Khot criticizes on Sharad Pawar)

सोलापूरमध्ये मीडियाशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पवार साहेब महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या लावण्यापलिकडं काहीही केलेलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि परत दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. आयुष्य त्यांचं आग लावण्यातचं गेलं. म्हणून मला वाटतं त्याचं आडनावचं आता 'आगलावे' करावं जेणे करुन राज्याची होरपळ आता थांबली पाहिजे"

ईडीच्या धाडी येड्यांवर पडत आहेत. सज्जनांना ईडीचा काहीही त्रास नाही, असंही सदाभाऊंनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलावरुन त्यांनी महाविकास आघाडीला कडक इशाराही दिला. वीजबील मागाल तर दांडक्यानं सोलून काढू, संपूर्ण वीजबील तुम्हाला माफ करावचं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

Fifa World Cup : चोरांचा इंग्लंडच्या ट्रेनिंग किटवर डल्ला... खेळाडूंचा सराव सुरू असताना व्हॅनमधून सामान पळवले, फक्त एक चेंडू ठेवला...

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

MPSC Success Story: वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले! जिद्दीच्या जोरावर अजय यलगंदकर बनले PSI; आईच्या कष्टाचे चीज केलं, संघर्षाला यशाची किनार..

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

SCROLL FOR NEXT