MPSC च्या उमेदवारांना दोन वाढीव संधी द्या! छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC उमेदवारांना वाढीव संधी द्या! संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

MPSC च्या उमेदवारांना दोन वाढीव संधी द्या! छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तात्या लांडगे

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दोन वाढीव संधी देण्याची मागणी केली आहे.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) मागील दोन वर्षांत नवीन पदभरतीची जाहिरात निघाली नाही. त्या काळातील MPSC परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने त्यांना मानसिक त्रास सोसावा लागला. वयोमर्यादेच्या काठावरील उमेदवारांनी भविष्याचा वेध घेऊन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वयोमर्यादा तथा परीक्षेच्या संधी वाढविण्याची मागणी लावून धरली. अनेकांनी त्यांना आश्‍वासनही दिले, परंतु त्याची पूर्तता अजून कागदोपत्री झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhajiraje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून दोन वाढीव संधी देण्याची मागणी केली आहे.

आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने उच्च शिक्षणानंतर अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून मोठा अधिकारी होण्यासाठी पुणे, मुंबईला येतात. पोटाला चिमटा घेऊन ते रात्रंदिवस अभ्यास करून त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतात. मात्र, कोरोनामुळे त्यातील बऱ्याच उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. अनेक वर्षे अभ्यास करूनही कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षाच न झाल्याने अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा उमेदवारांची बाजू घेत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून राज्य सरकारने उमेदवारांना दोन वाढीव संधी देण्याची मागणी केली आहे. आता राज्य सरकार तथा मुख्यमंत्री त्यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्यपालांना भेटून तरुणांनी दिले निवेदन

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुजित थिटे, मीना केदार, अक्षय पाटील, रोहित चांदोडे, प्रथमेश पाळेकर यांच्यासह एमपीएससी स्टुडंट राईट्‌स संघटनेचे महेश बडे, किरण निंभोरे, अरविंद वलेकर, राहुल कवठेकर, निलेश गायकवाड, विश्‍वंभर भोपळे यांनी आज राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेची चौकशी व्हावी, गट ब व क संवर्गातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्हावी, आयोगातील सर्व सदस्यांची भरती लवकर व्हावी, कोरोना काळात वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना दोन वाढीव संधी द्याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन दिले.

पत्रातील ठळक बाबी...

  • कोरोनामुळे दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही

  • काही वर्षांपासून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची काहीही चूक नसताना या काळात त्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली

  • मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, त्यांना दोन वाढीव संधी द्याव्यात

  • देशातील विविध राज्यांनी कोरोनामुळे उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेत वाढीव संधी दिली

  • महाराष्ट्र सरकारने 2019-20 आणि 2020-21 या दोन वर्षात ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली, त्यांना वाढीव संधी मिळावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT